Home » अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांना ब्रह्मरत्न पुरस्कार

अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांना ब्रह्मरत्न पुरस्कार

by Navswaraj
0 comment

अकोला : अखिल भारतीय समस्त बहुभाषीक ब्राह्मण महासंघातर्फे अकोल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांचा ब्रह्मरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडीत मालीरामजी शर्मा कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. राष्ट्रीय महामंत्री पंडीत सुर्यभान पांडे व प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी आमदार गोवर्धन शर्मा यांना ब्रह्मरत्न उपाधीने सन्मानीत केले. याप्रसंगी उदय महा, विजय तिवारी, अमोल चिंचाळे, सुधीर देशपांडे, रामप्रकाश मिश्रा, हितेश मेहता मंचावर उपस्थित होते. यावेळी ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून रामप्रकाश मिश्रा, राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी महापौर आश्विनी हातवळणे, संघटनमंत्री म्हणून किशोर नागवान यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ शर्मा यांनी केले. प्रस्ताविक गोवर्धन शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय गंगाखेडकर व सौरभ शर्मा यांनी केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!