Home » अकोल्यात कन्यारत्नांचा भाजपाला सार्थ अभिमान : डॉ. ओळंबे

अकोल्यात कन्यारत्नांचा भाजपाला सार्थ अभिमान : डॉ. ओळंबे

by Navswaraj
0 comment

अकोला : भारतीय जनता पार्टीच्यावतीने विशेषःत प्राविण्य प्राप्त गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अशोक ओळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. ओळंबे म्हणाले की अकोल्यातील या कन्यारत्नांचा भाजपाला सार्थ अभिमान आहे.

प्रथम आलेल्या गौरी प्रशांत साबळे व अमरावती विभागातून शतप्रतिशत मार्क मिळवलेल्या ६ विद्यार्थ्यांपैकी अकोला जिल्ह्यातील ३ विद्यार्थिनींनी शतप्रतिशत मार्क मिळवून अकोला जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यामुळे अकोला भाजपाच्यावतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुस्तकांची भेट देण्यात आली. सोबतच विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

यावेळी अकोला जिल्ह्यातील विध्यार्थी आणि विशेषत: विद्यार्थिनीनी शिक्षण क्षेत्रात ऊतुंग भरारी घेतली असून त्याचा भारतीय जनता पार्टीला सार्थ अभिमान असल्याचे भाजपा नेते डॉ. अशोक ओळंबे यांनी सांगितले. यावेळी पूर्वा शरद राठी, स्वरा राहुल पाटील, शरयू प्रकाश चतरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संजय चौधरी, दीपक मायी, आरती लढ्ढा, प्रकाश चतरकार, मुकेश गव्हाणकर, आशुतोष काटे, विनय नीचळ, गोपी ठाकरे, धनंजय गिरधर, सिद्धेश मुरारका, राजीव शर्मा, गजानन गोलाईत, श्रीकांत एखंडे, सचिन पागृत, प्रशांत जोशी, सचिन बोरेकर, सोनू उज्जैनकर, विजय मोटे, प्रभाकर वानखडे, विपिन ढोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!