Home » अकोला भाजपने जाहीर केली जम्बो कार्यकारिणी

अकोला भाजपने जाहीर केली जम्बो कार्यकारिणी

by Navswaraj
0 comment

अकोला : भारतीय जनता पक्षाची अकोला जिल्हा ग्रामीण कार्यकारिणीची घोषणा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील मांगटे यांनी केली आहे. कार्यकारिणीत एकूण ९२ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात आदिवासी, ओबीसी, महिला, डॉक्टर्स, सर्वसमावेशक जातींचा समावेश आहे. मांगटे पाटील यांच्या कार्यकारिणीत चार सरचिटणीस, दहा उपाध्यक्ष, दहा सचिव आणि ६४ कार्यकारिणी सदस्य आहेत.

सरचिटणीसपदी माधव मानकर, राधा तिवारी, सुनिल ठाकरे, ज्ञानेश्वर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी डॉ. शंकर वाकोडे, प्रभाकर मानकर, चंद्रशेखर पांडे, गणेश तायडे, मोहन आपोतीकर, अशोक राठोड यांची निवड करण्यात आली आहे. माजी नगरसेविका कुसुम भगत यांना सुद्धा पक्षाने जबाबदारी दिली आहे. पातुर तालुक्यात भाजपाचा विस्तार वाढवणाऱ्या चंदाताई लवाळे यांचीही वर्णी लागली आहे. कोषाध्यक्षपदी उद्योजक वसंत बाछुका, कार्यालय मंत्री म्हणून नाना कुलकर्णी यांच्याकडे कार्य सोपविण्यात आले आहे. सचिव म्हणून पंचायत समिती सदस्य सुषमा ठाकरे, विजयसिंह सोळंके, जयश्री गावंडे, डॉ. संजय शर्मा, मधुकर पाटकर, अनंत बगाडे, अशोक देशमुख, सविता काकड, अंबादास उमाळे यांची निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, माजी महापौर विजय अग्रवाल, जयंत मसने, अनुप धोत्रे, माजी आमदार डॉ. रणजीत पाटील, नारायण गव्हाणकर, वसंत खोटरे, बळीराम सिरस्कार, तेजराव थोरात, श्रावण इंगळे, शिवाजीराव देशमुख कायम सदस्य राहणार आहेत.

error: Content is protected !!