Home » अकोला : रेल्वेची प्रवाशांना आणखी एक भेट

अकोला : रेल्वेची प्रवाशांना आणखी एक भेट

by Navswaraj
0 comment

अकोला : उत्सवाच्या काळामध्ये मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांना अनोखी भेट दिली आहे. अजनी ते पुणेदरम्यान उत्सवाच्या काळात विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे.

पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या धावणार असून एलटीटी-बल्हारशाह विशेष रेल्वेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ०२१४१ पुणे-अजनी साप्ताहिक विशेष गाडी पुण्यावरून १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत दर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.५० वाजता अजनीला पोहोचेल. ०२१४२ अजनी-पुणे अजनी येथून १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुणे जंक्शनला पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कॉर्ड लाईन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा राहणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!