Home » मूर्तिजापूरजवळ गोवंश घेऊन जाणारा ट्रक पकडला

मूर्तिजापूरजवळ गोवंश घेऊन जाणारा ट्रक पकडला

by Navswaraj
0 comment

अकोला : आयशर ट्रकमध्ये निर्दयीपणे वाहतूक करण्यात येत असलेल्या गोवंशाची पोलिस आणि नागरिकांनी सुखरुप सुटका केली. मूर्तिजापूर​​​ येथील दर्यापूर रोडवरील उड्डाणपुलावर दर्यापूर व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शुक्रवार, २६ मे २०२३ रोजी दुपारी हा ट्रक पकडला.

आयशर ट्रक क्रमांक (सी.जी. ०४-एनझेड ६९३८) हा छत्तीसगड येथुन गोवंश घेऊन अवैधरित्या छत्तीसगडची सीमा पार करून महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याचे माहिती अमरावतीचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ठाकूर प्रमोद सिंह गडरेल यांना मिळाली. त्यांनी चांदूर बाजारपासून ट्रकचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करताना त्यांनी दर्यापूर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. दर्यापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक टाले यांनी यांच्या ताफ्यासह ट्रकचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करताना अकोला जिल्ह्याची सीमा येतअसल्याने त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक सचिन यादव यांना माहिती दिली. दर्यापूर व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी हा ट्रक उड्डाणपुलावर पकडला. यावेळी भाजपा, बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्तेही उपस्थित होते. या ट्रकमध्ये ६० पेक्षा अधिक गोवंश छत्तीसगडवरून कत्तलीकरता कोंबून नेत असल्याचे आढळले. यावेळी गोवंश रक्षकांनी संतप्त जनावरांना पाणी व चारा देण्याची मागणी केली. उपस्थित जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या.

गोवंश घेऊन जाणारा ट्रक भरधाव होता. त्यामुळे त्याचा टायर मूर्तिजापूर शहराजवळ फुटला. टायर फुटल्यानंतरही चालक अत्यंत भरधावपणे वाहन चालवित होता. मूर्तिजापूर येथील आठवडी बाजार असल्याने उड्डाणपुलावर वाहनांची व नागरीकांची गर्दी असल्याने चालकाला ट्रक पुढे काढता आला नाही. यावेळी घटनास्थळी पोलिसही दाखल झाले. याप्रकरणी दर्यापूर पोलीसांनी कारवाई केल्याची माहिती आहे.

पोलिसांनी पकडलेल्या ट्रकमध्ये कोंबण्यात आलेले गोवंश.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!