Home » केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखविली ‘अकोला-अकोट’ला हिरवी झेंडी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखविली ‘अकोला-अकोट’ला हिरवी झेंडी

by नवस्वराज
0 comment

अकोला : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवी झेंडी दाखवत अकोला-अकोट शटल रेल्वेसेवेचा बुधवार, २३ नोव्हेंबर २०२२ रोजी शुभारंभ केला. दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावरून ही गाडी सोडण्यात आली. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, विधान परिषद सदस्य आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, भाजप नेते विजय अग्रवाल, माजी महापौर अर्चना मसने, माजी आमदार नारायण गव्हाणकर आदी यावेळी उपस्थित होते. अकोला-अकोट शटल रेल्वेचा फायदा शेतकरी, आदिवासी व अकोट तेल्हारा परिसरातील नागरिकांना होणार आहे. उत्तर व दक्षिण भागाला जोडण्याचे महत्वपूर्ण काम होऊन अकोट-आमला खुर्द रेल्वेमार्ग सुद्धा लवकर सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील रेल्वे प्रकल्पांना मोदी सरकार व राज्य सरकार प्राथमिकता देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!