Home » अकोल्यात अखंड भारत सप्ताह संपन्न

अकोल्यात अखंड भारत सप्ताह संपन्न

by Navswaraj
0 comment

अकोला : १४ ऑगस्ट रोजी अखंड भारत सप्ताहाची सुरूवात करण्यात आली या निमित्त भारत माता पूजनाचा कार्यक्रम हिंदू जागरण मंच तर्फे गांधी चौक येथे आयोजित करण्यात आला होता. भारत मातेच्या अखंड स्वरूपाचे पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, प्रमुख अतिथी म्हणून प्रवक्ता श्रीधर गाडगे नागपूर व स्वानंद कोंडलीकर अकोला होते.

गाडगे यांनी अखंड भारता बद्दल अभ्यासपूर्ण माहिती दिली देशामध्ये कोणकोणत्या वेळी विदेशी आक्रमकांनी भूमी जिहादच्या माध्यमातून भारत मातेला खंडा खंडामध्ये विखंडित केले, आजही तसे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भारत मातेला अखंड ठेवण्यासाठी ज्या शूरवीरांनी शौर्य आणि पराक्रमाच्या बळावर भारत मातेचा अस्तित्व कायम ठेवले त्यांचा इतिहास त्यांनी युवकांना सांगितला. भारताला पुनश्च अखंड करण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

युवकांनी भारतमातेच्या अखंड स्वरूपाला नमन करून तसा संकल्प यावेळी केला. शांताराम निंधाने, संतोष अग्रवाल, चित्रा बापट, ज्योती टोपरे, निता वक्ते, गोपाल नागपुरे, देवा गावंडे आकाश ठाकूर, टिल्लु गावंडे, सुजित वाडे, पुष्पा वानखडे , साधना येवले, सुधीर देशपांडे, विनोद बसेरे, नरेश लख्खन, रितेश जामनेर, रवी चौबे, शभंम मेंढारे, गिरीश सुडे, नीरज मिश्रा, सचिन चौव्हान, अशोकसिंह ठाकूर, महेश शहा, गणेश कांबळे, गजानन खडसे, जयराम बसेरे, कुणाल निंधाने, दीपक टोपे, आकाश बिछेले, सोनू चावरे, निराधर सारडा, मंगेश पांडे, सूर्यकांत भरतिया, सारंग वझे, पवन धोपे, राधेश्याम शर्मा, गणेश सोनोने, बाळु ढोले, अविनाश खुनरे, उदय शहा, गिरीश नानोटी, अतुल ऐडने, संग्राम खानझोडे, ज्ञानेश्वर पाटील, अॅड. अलोने यांनी देखील संकल्प केला.

वसंत खंडेलवाल, विप्लव बाजोरीया विधान परिषद सदस्य, दीपक बलमे, रामप्रकाश मिश्रा, जयंत मसने, संजय धनाडै, डाॅ. प्रविण चव्हाण, सुरेंद्र जयस्वाल, आशिष भिमीजीयानी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. सकल हिंदू समाजामध्ये अखंड भारता बद्दल नवीन चेतना निर्माण व्हावी या उद्देशाने अखंड भारत सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी हिंदू जागरण मंचचे पालक भरत मिश्रा, जिल्हा संयोजक अंबरीश शुक्ला, जिल्हा ग्रामीण संयोजक, मयूर गुजर, सहसंयोजक, उमेश लख्खन, भूषण इंदोरीया, रतेश जामनेर, रोहन चंदन, महेश शाह, आकाश सावते, सुनिल गोराने, यांनी परिश्रम घेतले असे आकाश सावते यांनी कळविले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!