Home » विदर्भ-मराठवाड्यातील दौऱ्यानंतर अजित पवार यांचे फडणवीसांना पाच पानी पत्र

विदर्भ-मराठवाड्यातील दौऱ्यानंतर अजित पवार यांचे फडणवीसांना पाच पानी पत्र

by नवस्वराज
0 comment

मुंबई : विदर्भ व मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच पानी पत्र लिहिले आहे.

नुकसान भरपाईची दोन हेक्टरची मर्यादा शिथिल करावी, अतिवृष्टीत वाहून गेलेल्या जनावरांच्या पोस्ट मार्टमची अट शिथिल करून पोलीस पाटील, सरपंच, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला ग्राह्य धरावा, अतिवृष्टीमुळे खराब झालेले मुख्य रस्ते व पाणंद रस्ते तातडीने दुरुस्त करावेत. त्यासाठी नव्याने निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अतिवृष्टी आणि पुरानंतर पवार यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान विदर्भ आणि मराठवाड्यात झाले आहे. पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यानंतर पवार यांनी दौरा केला. सत्तेत असताना असे दौरे केले असते तर सत्ता गेली नसती, अशी टीकाही त्यांच्यावर झाली होती. हा दौरा आटोपल्यानंतर मंगळवारी (2 ऑगस्ट) पवार यांनी हे पत्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहे. पत्रात नमूद 21 मुद्द्याबाबत विचार करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!