Home » अजित कुंभार अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी

अजित कुंभार अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने शुक्रवारी निर्गमित केले. राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. यात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचाही समावेश आहे.

निमा अरोरा यांच्या जागेवर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सह आयुक्त कुंभार यांना पाठवण्यात आले आहे. अकोल्यामध्ये नियुक्त असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची बदली करण्यात आली आहे. अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून कटियार कार्यभार सांभाळणार आहेत. कटियार यांच्या जागी वैष्णवी बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंडे यांचाही समावेश असून त्यांना कृषी विभागाचे सचिव पदी नियुक्ती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंडे यांची बदली झाली होती. त्यानंतर आता पुन्हा बदली आदेश जारी करण्यात आले त्यातही मुंडे यांचे नाव आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!