Home » भारतीय दिव्यांग क्रिकेट‎ संघात अकोल्याच्या अजय डोंगरेंची निवड‎

भारतीय दिव्यांग क्रिकेट‎ संघात अकोल्याच्या अजय डोंगरेंची निवड‎

by नवस्वराज
0 comment

अकोला : भिवानी उत्तर प्रदेश येथे नेपाळ सोबत ३ ते ५‎ मार्च दरम्यान टी२० सिरीज होणार असून या क्रिकेट सामन्यांसाठी अकोला क्रिकेट क्लबचा अष्टपैलू खेळाडू‎ अजय डोंगरे याची संघात निवड झाली आहे.‎ अजय डोंगरे‎ याने भारतीय व संघाचे प्रतिनिधित्व करून‎ चांगल्या खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्याची‎ भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली‎ आहे.

अकोला जिल्हा दिव्यांग क्रिकेट संघ‎ नियमित अकोला क्रिकेट क्लब येथे सराव करीत‎ आहे. अजय डोंगरे हा जिल्ह्यातील पहिला‎ खेळाडू असून, अकोला क्रिकेट क्लब व‎ जिल्ह्या करता त्याची निवड ही अभिमानाची‎ बाब आहे, अशी माहिती अकोला क्रिकेट‎ क्लबचे कर्णधार, विदर्भ क्रिकेट संघटनेचे‎ जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.

अजय डोंगरे यांच्या निवडी बद्दल त्यांचे‎ अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पटेल, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय‎ देशमुख, सहसचिव कासम खान, ऑडीटर‎ दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य‎ ओमप्रकाश बाजोरिया, अशोक तापडिया,‎ देवा शर्मा, मार्गदर्शक अॅड. मुन्ना खान, माझी‎ कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य‎ जावेदअली, परिमल कांबळे, प्रशिक्षक सुमेद‎ डोंगरे, अमित माणिकराव, शारिक खान,‎ एस. टी. देशपांडे, जवाद मामू, अभिजित‎ मोरेकर, अभिजित करणे, किशोर धावेकर,‎ दिव्यांग क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुनील‎ वानखडे, सचिव इर्शाद खान यांनी कौतुक केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!