Home » पाऊस झालाय, पण तज्ज्ञ म्हणतात पेरणीची घाई नको

पाऊस झालाय, पण तज्ज्ञ म्हणतात पेरणीची घाई नको

by नवस्वराज
0 comment

अकोला : पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे पेरणीपूर्व कामांना वेग येणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करुन नये असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पेरणीपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. मात्र पाऊस झाला म्हणून लगेच पेरणी करू नका, असे आवाहन कृषी विभाग आणि राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना केले आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये असे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे.

मृग नक्षत्रावर हजेरी लावल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत पाऊस दांडी मारतो. मान्सूनच्या या बदलामुळे दरवर्षी लाखो हेक्टरवरील पेरण्या उलटतात. परिणामी घाई करू नका, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी तर अजिबात घाई करू नये, असे सांगण्यात आले आहे. प्रसंगी आपल्या भागातील कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांच्याशी संपर्क करूनच पेरण्या करा, असे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!