Home » पंडितांवरच्या वक्ताव्यानंतर डॉ. मोहन भागवत, आरएसएस ट्रोल

पंडितांवरच्या वक्ताव्यानंतर डॉ. मोहन भागवत, आरएसएस ट्रोल

by नवस्वराज
0 comment

नागपूर :  ‘काही पंडित शास्त्रांचा आधार घेत खोटं बोलतात’ असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुंबईत केल्याची टीका करीत नेटकऱ्यांनी सोशल माध्यमांवर #भागवत_माफी_मांगो या ट्रेन्ड चालवत आरएसएसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकारामागे विरोधकांचे षडयंत्र असून डॉ. भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे आरएसएस समर्थकांनी नमूद केले आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात रोहिदास समाज पंचायत संघ आणि वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी विचार व्यक्त करताना वरील विधान केले. ‘व्यक्तीचे नाव, क्षमता आणि प्रतिष्ठा काहीही असो, प्रत्येकजण समान असतो आणि त्यात कोणतेही मतभेद नसतात’, असे डॉ. भागवत यावेळी म्हणाले. ‘ईश्वर हेच शाश्वत सत्य आहे. नाव, क्षमता, प्रतिष्ठा काहीही असो, प्रत्येकजण समान असून कोणताही भेदभाव नाही. काही पंडित शास्त्रांच्या आधारे जे बोलतात ते खोटं आहे’, असे विचार डॉ. भागवातांनी व्यक्त करताच आरएसएसला ट्रोलिंग सुरू झाले.

पंडितांनी आपल्या स्वार्थासाठी समाजात उच्चनीचता निर्माण केली. भगवद्गीता व अन्य धर्मग्रथांनी समाजाला सत्य सांगितले. पण आपण भेदाभेद निर्माण करून सत्याचे अनुसंधान केले नाही. समाज विखुरला गेल्याने परकीय आक्रमकांनी त्याचा लाभ घेतल्याचे वक्तव्य डॉ. भागवत यांनी केल्याच्या अनेक पोस्ट सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. या ट्रोलिंगबाबत आरएसएसने अद्याप डॉ. भागवत यांच्या वक्तव्याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!