Home » वर्धेत साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत शुभारंभ

वर्धेत साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत शुभारंभ

by नवस्वराज
0 comment

वर्धा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्धेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद‌्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना विलंब झाल्याने ४० मिनिटे उशिराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.

मंत्री दीपक केसरकर, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, संमेलनाध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर, आमदार डॉ. पंकज भोयर, सागर मेघे, नरेंद्र भोंडेकर, गिरीश गांधी, मावळते अध्यक्ष भारत सासणे, कार्यवाह प्रदीप दाते, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यावेळी साहित्यपीठावर उपस्थित होते. या साहित्यपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे. ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी…’ या कविवर्य सुरेश भट यांचे गीत व संमेलन गीत तसेच दीप प्रज्वलनाने साहित्य संमेलनाला आरंभ झाला. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडी आणि मुलांनी केलेल्या ९६ वृक्षारोपणाने झाला.

दिंडी मार्गावरील घरे, व्यापारी संकुल, शाळांपुढे सडाशिंपण करीत रांगोळ्या रंगल्या होत्या. दिंडीतल्या पालखीत असलेल्या ग्रामगीता व अन्य ग्रंथाचे पूजन झाले. सर्वात लक्षवेधी सहभाग गुरूकुंज माेझरी येथील राष्ट्रसंत विद्यालयाच्या टाळमृदूंगाचा ठरला. भगव्या टोपीतील २५० बाल विद्यार्थी राष्ट्रसंतांची भजने तालासुरात व पदलालित्यासह गात पुढे निघाली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!