अकोला : वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अकोल्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्याचा खून केला. मृतक व्यसनाधीन होता, असे पोलिसांनी सांगितले. अकोल्यात गीतानगर भागात ही घटना मंगळवारी दुपारी घडली. सुनिल शिकारी हे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गीता नगर भागातील ही घटना आहे. सुनिल आणि त्यांचा परिवार हा छत्तीसगडहून अकोल्यात वास्तव्यास आला हेता. झाडू तयार करून त्यांची ते विक्री करायचे. सोमवारी रात्री या परिवारात वाद निर्माण झाला. त्यानंतर मंगळवारी दुपारी हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे संतप्त मुलाने चाकुने वार करून पित्याला ठार केले. पित्याची हत्या केल्यानंतर मुलाने आंघोळही केली. पोलिसांनी मारेकरी मुलाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतले आहे. जुने शहर पोलिस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.