Home » बहुआयामी अभिनेता विक्रम गोखले यांचे निधन

बहुआयामी अभिनेता विक्रम गोखले यांचे निधन

'नवस्वराज'साठी लिहिला होता खास लेख

by Navswaraj
0 comment

पुणे : अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले. रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टील दिग्गज अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती.  गेल्या काही दिवसापासून ते पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अभिनेता विक्रम गोखले यांनी ‘नवस्वराज’साठी लिहिलेला हाच तो लेख

तिसरा अंक व्हावा दमदार!

 

विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या बालपणीच मिळाला. त्याच्या पणजी दुर्गाबाई कामत, आजी कमलाबाई गोखले आणि वडील चंद्रकांत गोखले असा तीन पिढय़ांपासून अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केले. गेली सात दशके ते नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सिरीज अशा सर्वक्षेत्रात कार्यरत होते. अलिकडेच त्यांनी आपल्या कारकिर्दीवर लेखन करण्याचा निर्णय घेतला होता. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ”माझ्या अभिनय कारकीर्दीमध्ये आलेल्या भल्या-बुऱ्या अनुभवांना मी शब्दरूप देत आहे. या अनुभवांनी मला खूप काही शिकविले”, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गोदावरी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. हा त्यांचा अखेरचा मराठी चित्रपट ठरला. त्यांचा निकम्मा हा चित्रपट यंदा जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. एबी आणि सीडी हा २०२० मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटात विक्रम गोखले यांनी अमिताभ बच्चनसोबत मराठी चित्रपटात काम केले होते.

मिशन मंगल, हिचकी, अय्यारी, चॅम्पियन, अब तक छप्पन 2, भूल भुलैया, हे राम, हम दिल दे चुके सनम, वजीर, कैद में है बुलबुल, खुदा गवाह, धरम संकट , क्रोध, अग्निपथ, ये है जिंदगी , स्वर्ग नरक , प्रेम बंधन , इन्साफ , सलीम लंगडे पे मत रो, ईश्वर, थोडासा रूमानी हो जायें अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र अभिनेत्यांच्या भूमिका साकारल्या.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!