Home » अमिताभ बच्चन धावले होते विक्रम गोखले यांच्या मदतीला

अमिताभ बच्चन धावले होते विक्रम गोखले यांच्या मदतीला

by Navswaraj
0 comment

मुंबई : बहुआयामी चित्रपट अभिनेता विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. अत्यंत साधेपणाने राहणारे विक्रम गोखले मुंबईत आले त्यावेळी त्यांनी अत्यंत संघर्ष दिवस काढले.

विक्रम गोखले मुंबईत आल्यानंतर अत्यंत संघर्षात दिवस काढत होते. मुंबईत विक्रम गोखले यांना राहायला घरही मिळत नव्हते. घरमालक तोंडाला येईल ते भाडे सांगत होते. ही बाब त्यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांना कळली. अमिताभ बच्चन यांनी काहीही न बोलता त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या मनोहर जोशी यांना पत्र लिहिले. विक्रम गोखले हे अत्यंत चांगले कलाकार असून त्यांच्यासाठी काही करावे, अशी विनंती त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी केली. खरंतर अमिताभ बच्चन यांनाच त्यावेळी विक्रम गोखले यांची मदत करायची होती, परंतु बच्चन हे देखील त्यावेळी अडचणीतून जात होते. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले.

मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हे पत्र मिळतात त्यांनी तत्काळ विक्रम गोखले यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था करून दिली. अभिनयासोबतच विक्रम गोखले हे रियल इस्टेटचेही काम पाहत होते. त्यांची पुण्यात रिअल इस्टेट कंपनी होती. त्यांची पत्नी वृषाली या कंपनीचे काम पाहतात तर विक्रम गोखले त्यांना मदत करत होते. कालांतराने त्यांनी ही कंपनी बंद केली. विक्रम गोखले यांना दोन मुली असून एकीचे नाव निशा अडाव दुसरीची नेहा गोखले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!