Home » वाहने चालवणाऱ्या 22‎ अल्पवयीन मुलांवर कारवाई‎

वाहने चालवणाऱ्या 22‎ अल्पवयीन मुलांवर कारवाई‎

by Navswaraj
0 comment

अकोला : वाहने चालवणाऱ्या २२ अल्पवयीन‎ मुलांवर उपप्रादेशिक परिवहन‎ विभागाने शनिवारी दंडात्मक‎ कारवाई केली. ही कारवाई उप‎ प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री‎ दुतोंडे यांच्या आदेशानुसार करण्यात‎ आली.‎ बोरगाव मंजू रोड, नवोदय‎ विद्यालय जवळ, मंगरुळपीर रोड,‎ बार्शीटाकळी, मलकापूर, पिंजर रोड‎ आदी ठिकाणी रस्ता सुरक्षा विषयक‎ मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई‎ करण्यात आली.

कारवाई दरम्यान‎ एकूण ३५ वाहनांची तपासणी केली‎ असता त्यापैकी २२ अल्पवयीन‎ वाहनचालकांचा समावेश आहे.‎ तसेच हेल्मेट, सीट बेल्ट मोबाइल‎ टॉकिंग, योग्यता प्रमाणपत्र, इन्शुरन्स‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आदी बाबींवर कारवाई करण्यात‎ आली. ही कारवाई मोटार वाहन‎ निरीक्षक अभिजित टाले ,लेनिन‎ ढाले, गजानन हरणे, विनोद जाधव,‎ दिनेश एकडे, चालक गौतम‎ अरखराव व संदीप काळे यांनी‎ केली.‎

error: Content is protected !!