Home » अकोल्यातील पोक्सो खटल्यातील आरोपीची मुक्तता

अकोल्यातील पोक्सो खटल्यातील आरोपीची मुक्तता

by Navswaraj
0 comment

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या खटल्यातील आरोपी भावेश जैन याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पोस्को विषेश न्यायाधीश गोगरकर यांनी हा निकाल दिला.

अकोल्यातील खदान पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वाहन शिकवण्याच्या उद्देशाने तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जैन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्षीपुराव्यांच्या आधारावर व आरोपीची बाजू ऐकुन घेतल्यानंतर भावेश यांची निर्दोष मुक्तता केली. जैन यांच्यावतीने अॅड. राकेश पाली, अॅड. नागसेन तायडे, अॅड. कल्याणी तायडे, अॅड. आनंद साबळे यांनी काम पाहिले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!