Home » समृद्धीवर आणखी एक अपघात, कार ट्रकमध्ये घुसली

समृद्धीवर आणखी एक अपघात, कार ट्रकमध्ये घुसली

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : सिंदखेड राजा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तीन जण जखमी झालेत. सावरगाव माळजवळ हा अपघात घडला.

ओव्हरटेक करताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार ट्रकवर आदळली. यात डॉ. अब्दूल खालील यांचा जागीच मृत्यू झाला. ते मुंबईवरून येवदा या आपल्या मूळ गावी जात होते. यात त्यांची मुलगी मुस्कार खालीक, मुलगा अमन आणि पत्नी अमरीन हे देखील जखमी झालेत. अपघातानंतर त्यांना तातडीने जालना येथीन रुग्णालयात हलविण्यात आले. शुक्रवार, २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात घडला. महामार्ग पोलिस पथकाचे निरीक्षक शैलेश पवार, पोलिस उपनिरीक्षक उज्जैनकर, राणे, राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गावरील तत्काळ मदत दलांनीही जखमींना आवश्यक ती वैद्यकीय व ईतर मदत उपलब्ध करून दिली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!