Home » वाशिममध्ये भरधाव कारची दुभाजकाला धडक

वाशिममध्ये भरधाव कारची दुभाजकाला धडक

by Navswaraj
0 comment

वाशीम : वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावरील दुभाजक व पुलाच्या कठड्याला कारने जोरदार धडक दिली.

कारमध्ये गुजरात येथील गोयल दाम्पत्य होते. हे दाम्पत्य छत्रपती संभाजीनगरकडून नागपूरकडे जात होते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून पुरुषाच्या डोक्यालाही इजा झाली. वनोजा येथील गोपाल राऊत, सोपनील चौधरी, बाबाराव अवगण, दिलीप अवगण हे नागरिक समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब 108 वर फोन केला आणि अपघाती कारमधील जखमींना शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जखमींवर तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठवले.

error: Content is protected !!