Home » राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर अपघातात एकाचा जागीच मृत्यू

by Navswaraj
0 comment

अकोला : ट्रक आणि बोलेरो पिकअप व्हॅनच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाव खरब खरबडी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.

मुंबईवरून पटना बिहार येथे जात असलेल्या नव्या बोलेरो पिकअप व्हॅनला डाळींब भरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात बोलेरोचा चालक अजयसिंग अमरनाथसिंह हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळ गाठले व चालकाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर अजयसिंग याला मृत घोषित केले. पोलिस कर्मचारी दीपक कानडे, ज्ञानेश्ववर रडके, नागरिक अमोल खंडारे आदींच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

error: Content is protected !!