Home » वाडेगाव-बाळापूर मार्गावर ट्रक उलटला

वाडेगाव-बाळापूर मार्गावर ट्रक उलटला

by Navswaraj
0 comment

अकोला : वाडेगाव-बाळापूर मार्गावर भरधाव ट्रक नाल्याच्या कडेला उलटला. या अपघातात दोन जण जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.

वाडेगाव येथुन हा ट्रक ईटारसीकडे तुरीचा साठा घेऊन चालला होता. मांडवा फाट्याजवळ असलेल्या नाल्याच्या अरुंद पुलावरून ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यापूर्वीही या अरुंद पुलावरून अनेक अपघात घडले आहेत. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर जखमी झालेत. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी अपघातस्थळ गाठत जखमींना शासकीय रुग्णालयाकडे रवाना केले.

मांडवा फाट्याजवळ असलेल्या या पुलावर कोणतेही दिशादर्शक किंवा सूचना देणारे फलक नाहीत. नाल्याच्या पुलावर रेडियमही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे येथे दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करून येथे रेडियम असलेले फलक लावण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!