Home » डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचे टूर सर्कीट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचे टूर सर्कीट

by Navswaraj
0 comment

नागपूर : पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचे मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर येथे टूर सर्किट तयार करण्यात आले आहे.

या सर्कीटमध्ये नागपूर विभागातील दीक्षाभूमी, शांतीवन चिचोली, ड्रॅगन पॅलेस, नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धीजम या स्थळांचा समावेश आहे. संविधान दिनाचे औचित्य साधत पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर रोजी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कीट टूरचा शुभारंभ झाला.

स्थळांची प्रसिद्धी व प्रचालन करण्याकरीता ३, ४ व ७, ८ डिसेंबर या कालावधीत एक दिवसीय निःशुल्क सहल आयोजित करण्यात येणार आहे. या सहलीमध्ये पर्यटन विभागाद्वारे टूर गाईड, अल्पोपहार, बिसलरी पाणी, प्रथमोपचार किट इत्यादींची सुविधा राहणार आहे. सहलीचे आरक्षण ऑफलाईन पद्धतीने पर्यटन संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, वेस्ट हायकोर्ट रोड, ग्रामीण तहसील कार्यालय जवळ, सिव्हिल लाईन्स येथे नोंदणी करण्यात येत आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालययाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे. या सहलीकरीता प्रथम नोंदणी करणाऱ्यास  प्राधान्य देण्यात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!