Home » नागपुरात बाबासाहेबांचा तब्बल वीस लाखांचा पुतळा

नागपुरात बाबासाहेबांचा तब्बल वीस लाखांचा पुतळा

by Navswaraj
0 comment

नागपूर : दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या एका पुतळ्याची किंमत वीस लाख रुपये आहे. दीक्षाभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात पुतळ्यांची दुकानेही लावण्यात आली आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. या पुतळ्यांच्या किंमती हजार रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंत आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना विशेष मागणी असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. अष्टधातूपासून निर्मित या पुतळ्यांची आंबेडकरी संस्था, बौद्ध विहार समितीद्वारा मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या पुतळ्यांची किमंत काही हजार रुपयांपासून तर 20 लाख रुपयांपर्यंत आहे. यात अष्टधातू पासून तयार करण्यात आलेल्या पुतळ्यांना सर्वाधिक मागणी आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!