Home » ‘‘संशोधन पध्दती’’ याविषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

‘‘संशोधन पध्दती’’ याविषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

by Navswaraj
0 comment

‘‘संशोधन पध्दती’’ याविषयावरील एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

अकोला : श्रीमती ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालयात “रिसर्च, इनोव्हेशन आणि एक्सटेंशन क्वॉलिटी सर्कलच्या” अंतर्गत संशोधन पध्दती याविषयावर एक दिवसीय कार्यशाळा ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. जी जी गोंडाणे, रिसोर्स पर्सन प्राध्यापक डॉ. महेश डाबरे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल, रिसर्च इनोव्हेशन आणि एक्सटेंशन क्वालिटी सर्कलच्या समन्वयिका प्राध्यापक डॉ. वंदना मिश्रा, डॉ. अनिल तिरकर उपस्थित होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वंदना मिश्रा यांनी केले.

रिसोर्स पर्सन म्हणून डॉ. महेश डाबरे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे “टेकनीकल इशूज ऑफ रिपोर्ट रायटिंग” यावर संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना दिली. यामध्ये त्यांनी डेटा कसा गोळा करायचा? कोणत्या पद्धतीचा वापर करायचा? सांख्यिकीच्या पॅरामॅट्रिक आणि नॉन पॅरामॅट्रिक टेस्ट चा वापर केव्हा आणि कसा करायचा? नमुना कसा गोळा करायचा? प्रश्नावली व मुलाखती द्वारे डेटा गोळा करून रिसर्च प्रोजेक्ट, डेझर्टेशन, थेसीस कसा तयार करायचा? याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल यांनी नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत सर्वच विषयाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

डॉ. वासुदेव जोशी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिल तिरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेला प्राध्यापक वृंद व एम. कॉम. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!