Home » नागपुरात फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

नागपुरात फडणवीसांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याची धमकी

by Navswaraj
0 comment

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील घराबाहेर बॉम्ब ठेवल्याच्या धमकी देण्यात आलीय. नागपूर शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला यासंदर्भात फोन आला होता. सोमवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षात एकाने संपर्क साधला.

नागपूर येथील त्रिकोणी पार्क परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी निवासस्थान आहे. या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी फोन करणाऱ्याने पोलिसांना दिली. फोननंतर नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कळविले. नागपूर शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाला तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोकुळपेठेतील निवास्थानी पाठविण्यात आले.

बॉम्बचा शोध सुरू असतानाच पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवित एकास ताब्यात घेतले. फोन करणारा व्यक्ती हा नागपूरच्या कन्हान भागातील रहिवासी असून घरची वीज गेली म्हणून रागाच्या भरात बॉम्ब ठेवल्याचा फोन केला. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला देखील काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आले होते. हे फोन एका सराईत गुन्हेगाराने कारागृहातून केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी जयेश पुजारीला अटक करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना मारण्याची धमकी मिळाल्याची घटना ताजी असतानाच फडणवीस यांच्या नावे धमकी आल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली होती.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!