Home » अकोल्यात पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर पतीसमोरच अत्याचार

अकोल्यात पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर पतीसमोरच अत्याचार

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यात पत्ता विचारणाऱ्या अंध महिलेवर अंध पतीसमोरच अत्याचार करण्यात आला. अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गुलाम रसुल शेख मतीनला अटक केली आहे.

३१ मार्चच्या रात्री हा प्रकार घडला. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या नातेवाईकाकडे जात होते. रात्री बसस्थानकावर उशीर झाल्याने गाडी नसल्याने एका व्यक्तीने त्यांना हेरलं. रेल्वे स्टेशनवर नेतो असं सांगत आरोपी गुलाम रसुल शेख मतीन याने दोन्ही अंध पती-पत्नीला निर्जन स्थळी नेत अंध विवाहितेवर बलात्कार केला. काल या दाम्पत्याने या याप्रकरणी शहरातील सिव्हील लाईन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत रात्रीच आरोपी गुलाम रसुलला अटक केली.

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रस येथे आपल्या नातेवाईकाकडे जात होते. रात्री बसस्थानकावर उशीर झाल्याने गाडी नसल्याने एका व्यक्तीने त्यांना हेरलं. रेल्वे स्टेशनवर नेतो असं सांगत आरोपी गुलाम रसुल शेख मतीन याने दोन्ही अंध पती-पत्नीला निर्जन स्थळी नेत अंध विवाहितेवर बलात्कार केला. काल या दाम्पत्याने या याप्रकरणी शहरातील सिव्हील लाईन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत रात्रीच आरोपी गुलाम रसुलला अटक केली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!