प्रसन्न जकाते
नागपूर : केंद्र सरकारच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे राबविण्याचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलाय. त्यानुसार राज्यातील एकूण ५७ शहरांचा विकास करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
राज्यातील एकूण ९ महापालिका, ३० नगर परिषद, १८ नगर पंचायतींचा यात समावेश करण्यात आलाय. शहरांचे दरडोई उत्पन्न, पाणी पुरवठ्याची परिस्थिती, पक्क्या घरांची टक्केवारी, अनुसूचित जाती-जमातीची लोकसंख्या आणि जीएफसी स्टार रँकिंग लक्षात घेता या ५७ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
‘ड’वर्ग महापालिका : अकोला, परभणी, लातूर, सोलापूर, मालेगाव (नाशिक), जळगांव, नांदेड वाघाळा, भिवंडी, उल्हासनगर.
‘ब’ वर्ग नगर परिषद : देगलूर, आर्वी, सेलू, वसमतनगर, गंगाखेड, माजलगांव, मनमाड, सिल्लोड, जिंतूर, पैठण, मूर्तिजापूर, नांदुरा.
‘क’ वर्ग नगर परिषद : औसा, किनवट, गडचांदूर, लोहा, नेर नबाबपूर, मुदखेड, मानवत, तळोदा, चांदूरबाजार, पातूर, बिलोली, नळदुर्ग, मुरुम, परतूर, मुखेड, इगतपुरी, कन्हान-पिंपरी, पाथरी.
नगरपंचायती : मानोरा, मालेगांव – जहॉगिर, अर्धापूर, सडक – अर्जुनी, माहूर, सिंदखेडा, मंठा, भातकुली, मोखाडा, पाली, नायगांव, अंगार, भामरागड, फुलंब्री, नशिराबाद, एटापल्ली, बार्शीटाकळी, पालम.