अकोला : राज्यातील ३६ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने गुरुवारी रात्री जारी केले आहेत. या बदली आदेशांमध्ये अकोल्यातील तीन तहसीलदारांचा समावेश आहे.
बाळापूरचे तहसीलदार डी. एल. मुकुंदे यांची बदली नांदुरा, जि. बुलडाणा येथे करण्यात आली आहे. पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांची बदली बार्शीटाकळी येथे झाली आहे, तर बार्शीटाकळीचे तहसीलदार गजानन हामंद यांची बदली मानोरा जि. वाशीम येथील तहसीलदारपदी करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच राज्यातील ३६ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने जारी केलेत.