Home » खासगी ट्रॅव्हल पेटली 25 जणांचा कोळसा

खासगी ट्रॅव्हल पेटली 25 जणांचा कोळसा

by Navswaraj
0 comment

बुलढाणा : सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. बस पहिल्यांदा दिशादर्शक खांबाला धडकली. त्यानंतर ती बस दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसला आग लागली. या घटनेत २५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्सचे संचालक वीरेंद्र धरणे ही बस नागपूरहून ५ वाजता निघाली होती, यवतमाळचे ३, नागपूरचे ७ ते ८, वर्धा येथील १४ प्रवासी होते, अशी माहिती दिली. ही बस आम्ही जानेवारी २०२० मध्ये विकत घेतली होती. लॉकडाऊनच्या काळात बस बंद होती. गाडीची कागदपत्रं व्यवस्थित होती. गाडीचा फिटनेस होता. गाडीचा इन्शुरन्स होता. गाडीवरचा चालक आहे तो जुना चालक आहे. तो अनुभवी चालक आहे, अशी माहिती दिली.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति संवेदना प्रकट करुन या दुर्दॅवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!