Home » अकोल्यातील अकोटफैलात तणावपूर्ण शांतता

अकोल्यातील अकोटफैलात तणावपूर्ण शांतता

by Navswaraj
0 comment

अकोला : शहरातील अकोट फैल भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात झालेल्या हिंसक संघर्षानंतर सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास क्षुल्लक वादातून दोन गटात हाणामारीला सुरुवात झाली. त्याचे पर्यावसात दगडफेकीत झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी शंकरनगर भागात पोहोचले. तोपर्यंत हिंसक जमावाने काही वाहनांची तोडफोड केली होती. एएसपी सचिन गुंजाळ, महेंद्र कदम यांच्यासह अधिकारी आणि अतिरिक्त कुमक पोहोचल्यानंतर जमाव पांगला. रात्रभर या भागात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगलीप्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

बुधवारी शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ केल्यानंतर अकोट फैल परिसरातून रुटमार्च काढण्यात आला. अकोट फैल पोलिस स्टेशन, आंबेडकर चौक, तापडिया चौक, साबरिया चौक, अब्दुल कलाम चौक, शंकरनगर या भागातून हा रुटमार्च काढण्यात आला. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आवाहन केले. अकोला पोलिस कायदा व सुव्यवस्था स्थिती कायम राखण्यास सक्षम आहेत. ज्या भागात ही घटना घडली, त्या भागातील सशस्त्र पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही, असा ईशाराही अधीक्षक घुगे यांनी दिला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!