Home » अधिवेशन काळात राज्यातील 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अधिवेशन काळात राज्यातील 11 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

by Navswaraj
0 comment

नागपूर : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंगळवार 28 फेब्रुवारी रोजी गृह विभागाने राज्यातील 11 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तीन वेगवेगळ्या आदेशांमध्ये या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये नागपूर शहर पोलीस दलातील अप्पर पोलीस आयुक्त श्रीमती निवा जैन यांचाही समावेश आहे. अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये बिपिन कुमार सिंह, प्रभात कुमार, विनीत अगरवाल या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या तीनही अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांमध्ये राजकुमार व्हटकर, जय जाधव, कैसर खालिद, डी. के. पाटील भुजबळ यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षकांमध्ये एस. एच. महावरकर यांचे नावाचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये अभिजीत शिवथरे, पोर्णिमा चौगुले शृंगी आणि राहुल खाडे यांनाही बदलीने पदस्थापना देण्यात आली आहे. अधिवेशन काळात झालेल्या या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांना तातडीने रूजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

error: Content is protected !!